उल्हासनगरात महिला चोरट्यांचा उच्छाद; कपड्याचं दुकान, ब्युटी पार्लरमध्ये चोरी

या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. याबाबत उल्हासनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन या महिलांचा शोध सुरु केला आहे.

उल्हासनगर : रायगड माझा वृत्त 

उल्हासनगरमध्ये सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी असतानाच महिला चोरट्यांची एक टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या दोन दिवसात या चोरट्यांनी कपड्याच्या दुकानात आणि ब्युटी पार्लरमध्ये हातसफाई केली आहे.

उल्हासनगर शहराच्या कॅम्प 1 आणि कॅम्प 2 परिसरात या महिला चोरट्या सक्रिय झाल्या आहेत. या महिलांनी 1 नोव्हेंबर रोजी उल्हासनगरच्या अमन टॉकीज परिसरात एका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पर्स चोरल्या. तर त्यानंतर याच परिसरात असलेल्या सद्गुरु कलेक्शन नावाच्या कपड्याच्या दुकानात जाऊन कपडेही चोरले.

या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. याबाबत उल्हासनगर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन या महिलांचा शोध सुरु केला आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात, गर्दीच्या वेळी या महिला दुकानात घुसतील आणि हात साफ करून जातील, या भीतीने व्यापारी धास्तावले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत