उल्हास नदीत तरुणीची आत्महत्या

 कल्याण  : रायगड  माझा 

कल्याणनजीक असलेल्या उल्हास नदीपात्रात उडी मारून एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका माने असे या मृत तरुणीचे नाव असून ती कल्याणनजीक असलेल्या गाळेगाव येथे राहणारी आहे.

कल्याणनजीक असलेल्या गाळेगाव येथे पन्हाळा चौक येथे प्रियंका धनंजय माने (१७) व यश माने (१३) या दोन भावांसह राहत होती. त्यांच्या आईचे निधन झाले असून वडीलही सातारा येथे असतात. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शेजारी जाऊन येते, असे भावंडांना सांगून गेलेली प्रियंका परत आलीच नाही. सकाळी धनंजयच्या मित्रांनी प्रियंकाने गाळेगांव येथील उल्हास नदीच्या घाटाजवळ नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले. याची माहिती टिटवाळा पोलिस ठाण्यात देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत टिटवाळा पोलिस अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत