एअर इंडियाच्या विमानातून हवाई सुंदरी पडली खाली

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानातून ३० फुटांवरून महिला कर्मचारी (क्रू मेंबर) खाली पडून जखमी झाल्याची घटना आज सकाळी मुंबईत घडली. विमानाचा दरवाजा लावत असताना तोल गेल्याने ही महिला खाली पडली.

एअर इंडियाचे एआय-८६४ हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी जाणार होते. हर्षा लोबो (वय ५३) ही महिला विमानाचा दरवाजा लावताना खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पायलटची सहायक महिला ही दरवाजा बंद करत असताना खाली पडल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेविषयी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत