एअर हॉस्टेसने सोशल मीडियातून मांडली लैंगिक शोषणाची व्यथा

नवी दिल्ली : रायगड माझा

एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या एअर होस्टेसने वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. गेल्या सहावर्षांपासून एक अधिकारी शोषण करत असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करुनही एअर प्रशासनाने त्याच्यावर कोणती कारवाई केली नसल्याचे पीडितेने म्हटले आहे. यांसदर्भात तिने ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे.

पीडित एअर हॉस्टेसने सप्टेंबरमध्ये यासंदर्भात तक्रार केली होती. पण प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने तिने  सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावरील अत्याचाराची व्यथा थेट मोदी आणि प्रभूंसमोर मांडली. पीडितेच्या तक्रारीनंतर सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र समिती नेमूण चौकशी करण्याचे आदेश ‘एअर इंडिया’ प्रशासनाला दिले आहेत.

अधिकाऱ्याचे नाव न सांगता आपल्यासह इतर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. गेल्या सहावर्षांपासून अधिकारी गैरवर्तणुक करत होता. ऑफिसमध्ये बोलवून तो बळजबरीने दारू पाजयचा. माझ्यासह तो अन्य महिलांसोबतही असेच वागायचा. त्याने अपशब्द वापरुन अपमानित केल्याचेही पीडितीने तक्रारीत म्हटले आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर एअर इंडियामधील महिला अधिकाऱ्यानेही त्याला पाठिशी घातले. आमच्यासोबतही तो असेच वागतो, असे म्हणत महिला अधिकाऱ्यानेही थट्टा केल्याचा उल्लेखही एअर हॉस्टेसने तक्रारीमध्ये केला आहे.

शेयर करा

One thought on “एअर हॉस्टेसने सोशल मीडियातून मांडली लैंगिक शोषणाची व्यथा

  1. माराना तुम्हीं त्याला हात दिलेत ना देवाने मारायला का फ़क्त बांगडया घालायला

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत