एकच तिकीट खडकी असल्याने प्रवाशांच्या लांबच रांगा; अतिरिक्त खिडक्या सुरू करण्याची प्रवाशांकडून मागणी

नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

मागील २१ ऑक्टोंबर पासून सर्वसामान्य महिला प्रवाशांना लोकल रेल्वे ने प्रवास करन्याची परवानगी देण्यात आली असल्याने लोकल ने प्रवास करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. मात्र वाशी रेल्वे स्थानकात तिकटासाठी एकच खिडकी सुरू असल्याने या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी अतिरीक्त तिकीट खिडक्या सुरू कराव्या अशी मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा सात महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता लोकल रेल्वे बंद होती. मात्र २१ ऑक्टोबरपासून सर्वसामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ७ ते रात्री लोकल सुरु असेपर्यंत हा प्रवास करता येईल. त्यामुळे लोकलमध्ये आता सर्वच महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असल्याने महिला प्रवाशांचा कल रेल्वे प्रवासाकडे वाढला आहे. मात्र वाशी रेल्वे स्थानकात रेल्वे तिकीट काढण्यासाठी सध्या एकच खिडकी असल्याने या ठिकाणी तिकीटासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. परीणामी लोकल सुटल्या जात असून महिलांना कामावर, घरी जाण्याकरीता आणखी उशीर होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वाशी रेल्वे स्थानकात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू कराव्या, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत