एकाच बॅनरवरुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

रायगड माझा वृत्त 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शुभेच्छांचा एक अनोखा बॅनर मुंबईत पाहायला मिळाला. या बॅनरवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित झळकताना दिसून आले.

हा बॅनर नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील याच्याकडून लावण्यात आला होता.बॅनरवर वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित होतेच पण इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील एकाच बॅनरवर दिसून आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही फोटो या बॅनरवर आहेत. ऐरवी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकणारे राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते इथे चक्क एकत्र दिसून आले. नुकताचं राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेने हा शुभेच्छांचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी का होईना पण राष्ट्रवादी भाजपची युती झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत