एकाच वेळी 6 रोल्स रॉयस घेणारा कोण आहे हा भारतीय? CEO आला घरी

लंडन : रायगड माझा ऑनलाईन 

ज्याला कारचे वेड आहे त्याला रोल्स रॉयस कारबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाही. त्या प्रत्येकाला एकदा तरी या कारमधून फिरण्याची इच्छा असते. श्रीमंतांच्या दिमतीला अशी किमान एखादी रोल्स रॉयस असतेच. अनेकजण या कंपनीची एक कार खरेदी करण्याचं स्वप्न बाळगून असतात.

ब्रिटनचे बिल गेटस अशी ओळख असलेल्या भारतीय वंशाच्या रुबेन सिंह हे एकाचवेळी सहा रोल्स रॉयस कार खरेदी केल्याने चर्चेत आले आहेत. या कारच्या कलेक्शनला रुबेन यांनी 'Jewels Collection by Singh' असं नाव दिलं आहे. सहा गाड्यांच्या खरेदीसाठी त्यांनी 50 कोटी रुपये खर्च केले.

ब्रिटनचे बिल गेटस अशी ओळख असलेल्या भारतीय वंशाच्या रुबेन सिंह हे एकाचवेळी सहा रोल्स रॉयस कार खरेदी केल्याने चर्चेत आले आहेत. या कारच्या कलेक्शनला रुबेन यांनी ‘Jewels Collection by Singh’ असं नाव दिलं आहे. सहा गाड्यांच्या खरेदीसाठी त्यांनी 50 कोटी रुपये खर्च केले.

ऑलडेपीए काँटॅक्ट सेंटर कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या रुबेन यांच्या नव्या सहा कारपैकी तीन फँटम लग्जरी सिडान आणि तीन कलनिन लग्जरी एसयुव्ही आहेत. रोल्स रॉयसचे सीईओ  स्वत: गाड्यांची चावी देण्यासाठी रुबेन यांच्या घरी आले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत