एका क्लिकवर मिळणार जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्स ची माहिती

अलिबाग : अजय गायकवाड

Covid Hospital with 1024 beds ready in thane city zws 70 | १०२४ खाटांचे  कोविड रुग्णालय | Loksatta

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून “रायगड जिल्हास्तरीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली” कार्यान्वित करण्यात आली असुन या बाबत सर्व माहिती raigad.gov.in या वेबसाईटवर मिळणार आहे. जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णांना कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडस् ची,तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती होण्याची गरज निर्माण झाली असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची ही गरज तातडीने लक्षात घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या raigad.gov.in या वेबसाईटवर www.covid19raigad.in ही url लिंक संलग्न केली आहे.

या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडस् ची संख्या व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ समजू शकणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या शासकीय वेबसाईटवर जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या करोना उपाययोजनांबाबतची, शासन निर्णयाची, विविध शासकीय आदेशांची इत्यंभूत माहितीही उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, वरिष्ठ तांत्रिक संचालक व जिल्हा सूचना- विज्ञान अधिकारी चिन्ता मणि मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत