एका यकृताचा ठाणे ते दादर लोकल प्रवास

 मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

ब्रेन डेड झालेल्या 54 वर्षीय रुग्णाच्या लिव्हरमुळे एका तरुण रुग्णाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला. हे लिव्हर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून लोकलने दादरपर्यंत आणले गेले आणि तेथून एसी ऍम्ब्युलन्समधून ते ठरावीक वेळेत ग्लोबल रुग्णालयापर्यंत पोहोचल्याने ही लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकली.

ग्लोबल रुग्णालयात दाखल रुग्णाचे लिव्हर निकामी झाले होते. त्याला लिव्हर प्रत्यारोपणाची गरज होती. ज्युपिटर रुग्णालयात ते उपलब्ध झाले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे लिव्हर त्याला मॅच झाले. शस्त्रक्रिया करून ते काढले गेले आणि आज दुपारी तज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे ऍम्ब्युलन्समधून ते ठाणे स्थानकाच्या दिशेने निघाले.

दुपारी पावणे दोन ते अडीचच्या दरम्यान ठाण्याहून लोकलने ते लिव्हर दादरला आणले गेले. ती लोकल सवातीन वाजता दादर स्थानकात पोहोचली. ते ग्लोबलपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानकाबाहेर रुग्णालयाची ऍम्ब्युलन्स तयार होती. सायरन देत ऍम्ब्युलन्स दहा मिनिटांत ग्लोबल रुग्णालयात पोहोचली. तिथे डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या पथकाने ते लिव्हर दुसऱ्या रुग्णामध्ये शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपित केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत