एका रात्रीत नेरळमध्ये फोडली चोरटयांनी तीन दुकाने

नेरळ : अजय गायकवाड

नेरळमध्ये चोरटयांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात नेरळ परिसरात तब्बल १३ दुकाने चोरांनी फोडली आहेत. काल देखील चोरटयांनी नेरळमधील तीन दुकाने फोडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. काल मध्यरात्रीच्या वेळेस नेरळमध्ये चोरांकडून तीन दुकाने फोडण्यात आली. यामध्ये नेरळ मुख्य बाजार पेठेत असलेले एक मेडिकल आणि एक इलेट्रॉनिक सामनाचे दुकानं फोडले आहे. तर कर्जत कल्याण रस्त्याला लागून आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्णव मेडिकल हे दुकान देखील चोरांनी फोडले आहे. आज बुधवार हा नेरळच्या आठवडा बाजारचा दिवस असल्याने सकाळी दुकाने थाटण्यासाठी व्यापारी लवकर आलेअसता हा प्रकार उघडकीस आला. या दुकानात चोरांना चिल्लर शिवाय दुसरं काही नेता आले नाही. मात्र री हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरळ पोलीस स्टेशनच्या बाजूलाच चोरांनी चोरी केल्याने आता व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत