एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने बदलापूर-कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प

नेरळ : रायगड माझा

नेरळमध्ये विखापट्टणम एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने बदलापूर-कर्जत दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या रेल्वेच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

आज सकाळी नेरळ येथे लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये बिघाड झाली. त्यामुळे कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. सकाळी सकाळीच हा प्रकार घडल्यानं बदलापूर ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने अन्य  रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. पावणे दोन तासानंतर दुसरे इंजिन  आणल्यानंतर हि सेवा पूर्ववत झाली . यामुळे लोकल सेवेवर याचा विपरीत परिणाम झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत