एक लाखाची लाच मागणारा पाली महावितरणचा अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात !

पाली :विनोद भोईर

बंगलो स्कीमला ट्रान्सफार्मर, इलेक्ट्रिक पोल बसविण्याकरिता आणि नवीन वसाहतीला इलेक्ट्रिक मीटर देण्याकरिता एक लाख रुपयांची लाच मागणारा महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा पाली येथील अभियंता मुकेश गजभिये याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी कारवाई केली.

मुकेश गजभिये हे सध्या रोहा येथे कार्यरत आहेत. मुकेश गजभिये यांनी सुधागड तालुक्यातील लाविनायक कन्सट्रक्शन यांच्या तयार झालेल्या दोन नवीन इमारती करिता वीज मीटर आणि गजानन मांटे व सदानंद पाटील यांच्या द्वारे सुरु असलेल्या बंगलो स्कीमला ट्रान्सफार्मर, इलेक्ट्रिक पोल बसविण्याकरीता पाली येथील वीज वितरणच्या कार्यालयात २ फेब्रुवारी २०१८ रोजी मागणी केली. ते पैसे मागून दिले नाही म्हणून तक्रारदार यांची कामें प्रलंबित ठेवली या गोष्टीला तब्बल पाच ते सहा महिने गेल्याने त्याबाबतची तक्रार तक्रारदारांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्या नुसार नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी कुसुरकर यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मुकेश गजभिये यांच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत