एमआरडीए चे कार्यक्षेत्र रुंदावले  

अलिबाग पर्यंत लोकलसेवेचा मार्ग मोकळा 

मुंबई: रायगड माझा वृत्त 

मुंबई शहराची वाढती लोकसंख्या व पायाभूत सोयी-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अर्थात एमएमआरडीएची  हद्द वाढवण्याचा ठराव  विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.

मुंबईवरील वाढता  ताण कमी करण्याच्या हेतून एमएमआरडीए च्या कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातोय . सध्या एमएमआरडीए च्या कक्षेत ठाणे रायगड मधील काही भाग निश्चित आहे . पण आगामी काळात जर मुंबई वरील ताण कमी करायचा असेल तर एमएमआरडीए चे क्षेत्र विस्तारायला  हवे अशी मागणी सातत्याने केली जात होती . आता एमएमआरडीएच्या विस्तारामुळे लोकल ट्रेन थेट अलिबागपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  मुंबई महानगर प्रदेशातील परिसराचा जलदगतीने विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करण्याची मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा पैसा केवळ मुंबई व ठाण्यात न वापरता आसपासच्या परिसरात वापरला गेला पाहिजे. पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती.

त्यादृष्टीने मांडण्यात आलेला ठराव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यामुळे पालघर, वसई, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग आदी तालुक्‍यांचे सर्व भाग मुंबई महानगर प्रदेशात सामिल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत