एमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी!  

नेरळ : रायगड माझा वृत्त

एमएमआरडीएच्या माध्यमातून नेरळ शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. मात्र हे रस्ते तयार करतांना पावसाचे पाण्याचा निचरा होण्याची कोणत्याच प्रकारे योजना केली नसल्याचे दिसत आहे. अर्धातास पाऊस पडल्यानंतर   नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून नेरळ मधील  नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढावा लागत होता.
एमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी!
सुरेश टोकरे हे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना  नेरळ शहरातील प्रत्येक रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी एम एम आर डी  ए ने या कामासाठी निधी मंजूर केला.  हे काम करतांना संबधित विभागाने आणि ठेकेदाराने गटार व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरु होण्याच्या आगोदरच नेरळच्या रस्त्यांवर पाणी साचण्याचे दृश्य दिसू लागले आहे. आज नेरळ परिसरात पाऊस पडल्याने नेरळ अंबिका नाका ते नेरळ स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी असणाऱ्या गटारातून पाणी वाहून न गेल्याने नेरळ बाजारपेठ पाण्याने भरली होती. याचा नागरिकांना मोठा त्रास झाला.
रस्ते बनवतांना नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी रस्त्यांची कामे ही व्यवस्थित होण्यासाठी वारंवार लक्ष घातले होते, मात्र याकडे नेरळ प्राधिकरणाने आणि ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला असलेले गटारांची उंची जास्त असल्याने रस्त्यावरून वाहून येणारे पाणी गटारात न जाता रस्त्यांवरूनच वाहून जात आहे. रस्त्यावर येणारे पाणी गटारात जाण्यासाठी असणारे चेंबर देखील बंद ठेवण्यात आले आहेत. एकूणच नेरळ मध्ये  रस्त्यांसाठी केलाला हा खर्च पावसाच्या पाण्याबरोबर तर वाहून जाणार नाही ना, ही काळजी नागरिकांना लागली आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत