एलईडी मासेमारीला बंदी असली बेकायदेशीर मासेमारी सुरूच

मुरूड जंजिरा :अमूलकुमार जैन

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बंदरात जनरेटर असलेली बोट उभी असल्याने एलईडी दिव्यांनी समुद्रात होणारी प्रकाशझोतातील मासेमारीवर केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही बंदी घातली असल्याचा दावा फोल ठरला आहे.

प्रकाशझोतातील मासेमारी पद्धत पारंपरिक आणि छोटय़ा मच्छीमारांचे मोठे नुकसान करणारी आहे. प्रकाशझोतातील मासेमारीमुळे माशांची संख्या झपाटय़ाने घटून लहान मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येऊ शकते. यामुळे प्रकाशझोतातील मासेमारी बंद करावी, अशी मागणी जोर धरू लागली. गेल्या दोन महिन्यात रेवदंडा बंदरात भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचारी यांनी दोन बोटी गस्तीदरम्यान पकडल्या होत्या तर गेल्या महिन्यात अलिबाग मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी दिनेश पाटील यांनी आशा हले यांच्या बोटीवर कारवाई केली होती.त्यानंतर सुद्धा रायगड जिल्ह्यासाहित अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली होती.

एलईडी दिव्यांनी समुद्रात होणारी प्रकाशझोतातील मासेमारीवर तत्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. तरीही एलईडी मासेमारीला बंदी असली तरीही बेकायदेशीर रित्या मासेमारी सुरूच आहे.

एलईडी दिवे आणि बुलनेट ट्रॉलिंगचा वापर करून मासेमारी सुरू राहिल्यास जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होत होती. यातच केंद्र शासनाने या दोन्ही मासेमारी पद्धतींवर नोव्हेंबर २०१७ मध्ये बंदी लागू केली. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून मोठा गदारोळ झाला. केंद्र शासनाच्या अखत्यारितील बारा नॉटीकल पुढे कारवाई करणार कोण? अशात कारवाई लटकली. केंद्राने एलईडी मासेमारीवर बंदी घातल्यानंतर राज्याच्या हद्दीतही एलईडी मासेमारीला बंदी घालावी अशी मागणी मच्छीमारांकडून सुरू होती. मच्छीमारांच्या मागणीला राज्य शासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या सागरी किनारपट्टीवर (१२ सागरी मैल) ट्रॉलिंग, पर्ससीन, गिलनेट किंवा डोलनेट या यांत्रिक मासेमारी नौकाना जरनेटर अथवा जनरेटर न लावता एलईडी अथवा अन्य प्रकारची माशांना आकर्षित करणारी लाईट साधने वापरण्यास बंदी. तसेच बुलट्रॉलिंग व पेअर पद्धतीच्या मासेमारीसही बंदी.. आदेशाचे उल्लंघन करणा-या मासेमारी नौका व त्यांना साहाय्य करणा-या नौकांवरही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भविष्यात मासेमारी व्यवसाय टिकून राहावा यासाठी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे. यासाठी जेटय़ांवर सागरी पौलीस तैनात करून एलईडी दिवे वापरणारे ट्रॉलर तसेच जनरेटर व अन्य साहित्य आणण्यास बंदी घालण्यात यावी आणि असे साहित्य आढळून आल्यास ते जेटीवरच जप्त करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात मोसमारीच्या पद्धतीत काळानुरूप बदल होत गेला. यातूनच बुलनेट मासेमारीची पद्धती समोर आली. बुलनेट पद्धतीने होणा-या मासेमारीमुळे स्थानिक पारंपारीक मच्छीमारांच्या जाळ्यातील मासळी हिरावली जात होती. यामुळे बुलनेटच्या मासेमारी बंद करण्याची मागणी जोर धरत होती.

तरीही बेकायदेशीर रित्या खुलेआम अगदी प्रकाशझोतातील मासेमारी सुरू आहे.म्हणून तर बोटीवर जनरेटर असलेली बोट ही रेवदंडा बंदरात उभी होती याबाबत अलिबाग मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी दिनेशपाटील यांना सांगितले असता त्यांनी सांगितले की,सागर सुरक्षा रक्षक यांना पाठवून माहिती घेतो.मात्र एलईडी मासेमारी ही बंद असल्याचा दावासुद्धा त्यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत