एल्फिन्स्टन रोडचे झाले ‘प्रभादेवी’, नवीन बोर्डाचा एक्सक्लुझिव्ह फोटो

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारी मध्यरात्रीपासून प्रभादेवी स्थानक करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री ११ वाजता प्रभादेवी मंदिरात देवीची पूजा करून, शोभा यात्रा एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाला ११.४५ मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजता ‘प्रभादेवी रेल्वे स्थानक’ असा नामकरण सोहळा होणार आहे. याच अनुषंगाने रेल्वे स्थानकावरील बोर्ड काढायला सुरुवात झाली आहे.

एल्फिन्स्टन रोडचे झाले ‘प्रभादेवी’

पश्चिम रेल्वेच्या या स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली होती. सर्वात प्रथम शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी लोकसभेत ही मागणी केली होती. तसेच इंग्रजांच्या नावावरून दिलेली इतर स्थानकांचीही नावे बदलावीत, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून ‘प्रभादेवी’ नावास अंतिम स्वरूप दिले. या नामकरण कार्यक्रमला खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याचे परिपत्रक पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी काढले होते. मुंबई प्रेसिडन्सीचे १८५३ ते १८६० दरम्यान गर्व्हनर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून या स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड ठेवण्यात आले होते. प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत