एसटी कर्मचारीही काढणार आक्रोश मोर्चा, 2 आंदोलनाची घोषणा; संपावर जाण्याचा इशारा

( रायगड माझा वृत्त )

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन आंदोलनांची घोषणा केली आहे. वेतनवाढीबाबतच्या अहवालाची होळी 25 जानेवारीला केली जाणार आहे. तसेच 9 फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

अत्यल्प वेतनवाढीची शिफारसएसटी कर्मचारीही काढणार आक्रोश मोर्चा, 2 आंदोलनाची घोषणा; संपावर जाण्याचा इशारा

हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काढायचा की मातोश्रीवर ते लवकरच जाहीर करण्यात येईल. या आंदोलनांनंतरही शासन जागे होत नसेल तर संपाशिवाय पर्याय नसल्याचं कृती समितीने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत झालेल्या उच्चस्तरीय समितीने एसटी कामगारांसाठी केलेली वेतनवाढीची शिफारस अत्यल्प आहे, असा आरोप करत एसटी कामगार संघटनांनी आज पुन्हा संपाचा इशारा दिला.

वेतनवाढीचा अहवाल सादर

ऑक्टोबरमध्ये राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी झालेल्या वाटाघाटीत सरकारने 1 हजार 76 कोटींच्या वेतनवाढीचा प्रस्ताव एसटी कामगार संघटनांपुढे ठेवला होता. मात्र संघटनांनी तो फेटाळून लावला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने यावर तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वेतनवाढीसंदर्भातील शिफारशींचा अहवाल नुकताच न्यायालयास सादर केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत