एसटी-कारची धडक; आठ ठार

नाशिक: रायगड माझा 

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ एसटी बस आणि क्रूझर गाडीला आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

क्रूझर गाडी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील असून गाडीतील सर्वजण एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाले होते. पिंपळगाव आणि चांदवड दरम्यान ही गाडी एका एसटी बसला समोरून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एसटीचंही मोठं नुकसान झालं. अपघातामुळं या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत