एसयूव्हीच्या धडकेत 3 ठार: पुलावरून पडणाऱ्या आईने बाळाला हवेत फेकले, दुसऱ्या महिलेने झेलले

नवागाम फ्लायओव्हरवर रात्री 9 वाजता अपघात झाला.

मृत्यूआधी पुलावर पडणाऱ्या आईने आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला हवेत फेकले, दुसऱ्या महिलेने अलगद झेलले.

सुरत  : रायगड माझा 

शहराच्या नवागाम उड्डाणपुलावर रविवारी रात्री एका एसयूव्ही पजेरोने दुचाकी वाहनाला धडक दिली. पजेरो भरधाव आणि चुकीच्या दिशेने जात होती. अपघातात 5 जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक लहान मुलगी, महिला आणि एक पुरुष आहे. यादरम्यान एक चमत्कारही झाला. भरधाव एसयूव्ही येत असलेली पाहून एका बाइकस्वार दांतप्य रोहित आणि लक्ष्मीने आपली गाडी रेलिंगकडे वळवली, त्यामुळे दोघेही बचावले. दुसरीकडे, त्यामागून येणाऱ्या बाइकला पजेरोने धडक दिली. उड्डाणपुलावरून पडत असताना महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या बाळाला वाचवण्यासाठी त्याला रोहित आणि लक्ष्मी पाटील यांच्या दिशेने हवेत फेकले. लक्ष्मी यांनीही त्याला हवेतल्या हवेत अलगद झेलले. यामुळे बाळाचा जीव वाचला. परंतु त्याच्या आईचे प्राण वाचू शकले नाहीत.

उड्डाणपुलावर 30 फूट खाली कोसळले:
अपघातग्रस्त झालेली मोटारसायकल एक तरुण चालवत होता. त्यावर एक महिला, 6 महिन्यांचे बाळ आणि एक 8 ते 9 वर्षे वयाची मुलगी बसलेले होते. दुसऱ्या मोटारसायकलवर एक महिला बसलेली होती, ती एक प्रौढ व्यक्ती चालवत होती. दुसरीकडे, तिसऱ्या बाइकला एक तरुण चालवत होता. तिन्ही कुटुंबे वेगवेगळी होती. यादरम्यान, पजेरोने ब्रिजवर तीन बाइकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, एक महिला आणि एक पुरुष उड्डाणपुलावरून उसळून 30 फूट खाली जाऊन पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, 8-9 वर्षांच्या चिमुरडीचा उड्डाणपुलावर मृत्यू झाला. जखमी नारेश्वर पाटील (कड़ोदरा), राजेश केवट (डिंडोली) यांना न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दारूच्या नशेत होता ड्रायव्हर:
धडक मारल्यानंतर पजेरोमध्ये स्वार 3 जण उतरून पळून गेले. तिघेही वेगवेगळ्या दिशेने पळाले. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत पजेरोच्या मालकाचा शोध लागला नव्हता. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पजेरोचा ड्रायव्हर दारूच्या नशेत तर्रर होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.