ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकला!

महाराष्ट्रातील १० किल्ले संरक्षित करून विकासाचा नवा आयाम आखणार : खासदार संभाजी राजे भोसले

मुरूड जंजिरा : अमूलकुमार जैन

जंजिरा किल्यावर कायमस्वरूपी तिरंगा असावा या करिता सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार केला होता. याकरिता मागील सहा महिन्यांपासून प्रतिष्ठानचे संस्थापक. श्रमिक गोजमगुंडे आणि महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखालीपाठपुरावा केल्यानंतर आज सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार संभाजी राजे भोसले यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.यावेळी पोलीस बँड ने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे सुमारे पाच हजाराच्या वर जनसमुदाय जंजिरा किल्ल्यावर उपस्थित होता.

Image may contain: sky and outdoor

यावेळी आमदार संजय केळकर,जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी,जिल्हा पोलिसाधिक्षक अनिल पारस्कर,पुरातत्व खात्याचे अधीक्षक बिपीनचंद्र नेगी,सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे ,मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील,
राजपुरी सरपंच हिरकणी गि दी,जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे संदीप पाडेकर,रक्षित पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढोल ताश्याच्या गजरात जंजिरा किल्ल्यावरील परिसर दणाणून गेला होता.किल्ल्याचा सर्व बाजूला रांगोळी व फुलांच्या माळांनी सर्व परिसर सजवला गेला होता. सह्याद्री प्रतिष्ठानच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थतीमुळे किल्याचा परिसर गजबजून गेला होता.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजी राजे भोसले म्हणाले कि,शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ला रायगड साठी ज्याप्रमाणे ६०० कोटीची तरतूद करून सदरचा किल्ला संरक्षित करून तिथे आवश्यक असणारा विकास केला जात आहे.त्याप्रमाणे महाराष्ट्रातील ४५ किल्ल्यांपैकी १० किल्ले हे प्रथम संरक्षित करून त्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी व हरवलेले गत वैभव मिळवून देण्यासाठी नुकतीच मी प्रनतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव दीपेंन मिश्रा यांची भेट घेतली त्यावेळी माझ्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते.

या निवडलेल्या १० किल्ल्यांवर रायगड किल्ल्याच्या पॅटर्नप्रमाणे विविध विकास कामे करण्यात येऊन पूर्वीचे गत वैभव प्राप्त होणार आहे.यासाठी प्रधान सचिव यांनी विशेष मान्यता दिली असून येत्या काही काळात येथे सुद्धा विविध कामे सुरु झाल्याची आपणास पहावयास मिळतील असे प्रतिपादन खासदार भोसले यांनी यावेळी केले.त्यांच्या या वाक्यामुळे उपस्थित असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या हजरो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट मोठी दाद दिली.

यावेळी खासदार संभाजी राजे भोसले आपल्या भाषणात म्हणाले कि,महाराजांनी बांधलेले किल्ले हे आपणास नेहमीच प्रेरणा व स्फूर्ती देत असतात.किल्ल्यांचे संरक्षण हे शास्त्रीय पद्धतीने होणे खूप आवश्यक आहे.यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना वेगळा अभ्यासाचे प्रशिक्षण देण्यात येईल.किल्यांच्या सुरक्षितेबरोबरच किल्यांवरील स्वछता सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. यासाठी शिवप्रेमी संघटनांनी एक एक किल्ला घेऊन त्या किल्ल्याच्या स्वचतेकडे लक्ष दिल्यास हे काम सुद्धा संपन्न करता येणार आहे. निवडलेल्या १० किल्ल्यांमध्ये जंजिरा व सिंधुदुर्ग किल्ल्यांचा सुद्धा समावेश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले कि, ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी ५५० लोकप्रतिनिधींच्या सह्यांचे निवेदन पुरातत्व खात्याला देण्यात आले होते.या किल्ल्यावर तिरंगा फडकला याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जंजिरा किल्ल्या संभाजी राजांना जिंकून देण्यासाठी बहुमूल्य मदत करणारे वंशनज याचा शाल श्रीफळ व फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.

शेयर करा

One thought on “ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकला!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत