ऐतिहासिक ठेवा जपणाऱ्या मोटेच्या तलावाने कात टाकली; नागोठण्याच्या सौंदर्यात भर

नागोठणे : महेंद्र म्हात्रे

नागोठणे येथील श्री जोगेश्वरी मंदिर परीसरांत गावाच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक मोटेच्या तलावाचे रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठण्याच्या मदतीने व नागोठणे जि. प. सदस्य किशोर जैन यांच्या पुढाकाराने रुपडेच पालटले असुन तलावाच्या दुरुस्तीने गावाच्या सौंदर्यात भर पडली असल्याचे नागोठणे गावचे प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व वसंतराव ऊर्फ दि. स. महाजन यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे जोगेश्वरी मंदिर परीसरांत असलेल्या त्या मोटेच्या तलावाची पुरती दुरावस्था झाली होती. तलाव बांधकाम करुन अनेक वर्षे लोटल्याने हा तलाव खिळखिळा झाला होता. चार पैकी तिन बाजूच्या भिंती तुटल्याने पावसाळ्यांत गटाराचे व  नाल्याचे पाणि थेट तलावात जात होते.
मोटेचा तलाव हा एकेकाळी नागोठणे गावची तहान भागवत असल्याची माहीती दि. स. महाजन यांनी यावेळी दिली. पुर्वी हा तलाव डबके वजा डोव्हरा होता. हा तलाव पुरुषोत्तम निळकंठ फडतरे यांच्या मालकिचा होता. सन १९४२/४३ ला जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष नानासाहेब टिळक यांच्या विनंतीवरून गावकिकडे व नंतर पर्यायाने ग्रामपंचायतीकडे  हस्तांतरीत केला. त्यावेळचे ग्रामपंचायत सदस्य सदूकाका देशपांडे यांनी डबक्यात दगडाच्या अर्ध्या भिंती बांधून तलावाचा आकार दिला. नंतर सन १९७१/७२ च्या कालखंडात नागोठणे ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता गाजवणारे एन. एम. मोरे व तात्यासाहेब टके यांनी तलावाच्या भिंती वर उचलून तलावाला रुप दिले.
तलावाच्या दक्षिण बाजूच्या भिंतीला तलावातून पाणि वर काढण्यासाठी मोट (रहाट) लावली गेली व तेव्हा पासून या तलावाचे नामकरण मोटेचे तळे असे झाले. पुढे याच मोटेच्या तलावाच्या भिंती कालांतराने पुर्णपणे मोडकळीस आल्या.
पावसाळ्यात गटाराचे व नाल्याचे पाणि थेट तलावात जाऊ लागले. ग्रामपंचायतीकडे निधीची कमतरता असल्याने हे प्रचंड लांबी रुंदीचे मोटेचे तळे दुरुस्त करणे शक्य नव्हते . यासाठी ग्रामपंचायतींने शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार तथा नागोठणे विभाग जिल्हापरिषद सदस्य किशोर जैन यांच्या कडे तलावासाठी रकमेची तरतूद करुन द्यावी असा अग्रह केला. ग्रामसभेत देखिल तलाव बांधकामाची मागणी होऊ लागल्याने जि. प. सदस्य जैन यांनी केंद्रीय मंञी अनंत गिते यांच्याशी सल्लामसलत करुन रिलायन्स इंडस्ट्रीज चे नागोठणे युनिट अध्यक्ष अविनाश श्रीखंडे यांच्याजवळ संपर्क साधून सी. एस. आर. फंडातून तलाव दुरुस्त करुन देण्याचे मान्य केले. व कंपनी इंजिनियरच्या देखरेखेखाली कंपनी कंञाटदाराकडून प्रत्यक्ष तलावाच्या कामास सुरवात केली.
 
विकास कामांत राजकारण आडवे आले
तलावाचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण व्हावे या करिता जि. प. सदस्य किशोर जैन प्रयत्नांची पराकष्टा करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. रिलायन्सच्या ठेकेदाराने तलावाच्या कामाची वर्क आँर्डर ग्रामपंचायतीच्या माहीतीसाठी सादर केली व प्रत्यक्ष कामाला सुरवात देखिल झाली. परंतू नागोठण्यांत तलावाच्या कामात राजकारण आडवे आले. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने शासकिय यंञणेला हाताशी धरून  ग्रामपंचायत अचारसंहितेचे कारण पुढे करीत अचारसंहितेपूर्वी चालु झालेले काम थांबविण्यास भाग पाडले . नागोठण्यांतील काही बोरुबहाद्दरांनी ज्यांना गावाशी किंवा गावाच्या  विकासाशी काही घेणेदेणे नाही अशांनी याच संधिचा अधिक फायदा उचलला. व तलावाचे काम कायमचे कसे थांबेल या साठी राजकिय पक्षाच्या सुपारया घेतल्या. व काम कसे होणार नाही यासाठी दैनिकाच्या माध्यमातून  आजही प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे.
मुळातच हे काम रिलायन्स कंपनी आपल्या नियुक्त ठेकेदाराकडून कंपनीच्या अभियंताच्या देखरेखेखाली उभे राहून करीत असताना या बोरुबहाद्दरांने निकृष्ट दर्जाचे काम, दुरुस्ती अपुर्ण, तलावात पाणि भरण्यास सुरवात, होल बुजली अश्या प्रकारच्या बातम्या देऊन कंञाटदाराला पळवून लावण्याचा व कामांत अडथळे आणण्याचा केविलवाणा प्रयत्न चालु ठेवला आहे.
विशेष म्हणजे गावकरयांनी तलावाचे झालेले काम पाहून जि. प. सदस्य किशोर जैन व ग्रामपंचायतींकडे समाधान व्यक्त करताना या बोरुबहाद्दरांकडे लक्षन देता विकासकामे चालु ठेवा, ते हे का करीत आहेत हे गावाला चांगले माहीत आहे असा सल्ला वेळोवेळी दिला आहे. राजकारण्यांनमुळे व एक दोन बोरुबहाद्दरांच्या अडथळ्यांमुळे व पावसामुळे तलावाचे थोडेफार काम  बाकी असून यांत काही नविन सुधारणा सुचविल्या असून पावसाळ्यानंतर ती कामे पुर्णत्वास जातील असे शेवटी जि. प. सदस्य किशोर जैन यांनी सांगून केंद्रिय मंञी अनंत गिते तसेच रिलायन्स कंपनीने या कामात सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत