ऐन लग्नाची तयारी सुरू असताना म्हणाली नवरी- ‘माझ्या प्रियकराशी लग्न लावून द्या!’

दाहोद  :रायगड माझा

  लिमखेडा येथील एका गावात एका तरुणीचे बळजबरी लग्न लावले जात असल्याची सूचना 181 वर महिला हेल्पलाइनला मिळाली. यामुळे पूर्ण टीम सतर्क झाली आणि गावातील सरपंचाशी त्यांनी संपर्क केला. यानंतर टीम संबंधित तरुणीच्या घरी पोहोचले. तेथे तरुणीने हट्ट धरलेला होता की, माझे लग्न माझ्या प्रियकराशी लावून द्या.

महिला हेल्पलाइनने काढली समजूत…
टीमला तरुणीने सांगितले की, माझे लग्न माझ्या प्रियकराशी न लावता माझ्या घरचे गावातील एका तरुणाशी लावत आहेत. तरुणी कुठे पळून जाऊ नये म्हणून घरच्यांनी तिला एका रूममध्ये बंद करून ठेवले होते. महिला हेल्पलाइनची टीम जेव्हा तरुणीकडे गेली, तेव्हा ती आपल्या मागणीवर ठाम होती. यामुळे कुटुंबीय त्रस्त झाले होते. यामुळेच त्यांनी तिला एका रूममध्ये बंद केले होते. पथकाने तरुणीची समजूत घातली की, तुझ्या घरच्यांना तुझे वाईट होऊ द्यायचे नाही. तू ज्या तरुणाशी प्रेम करतेस तो बेरोजगार आहे. दुसरीकडे तुझे ज्याच्याशी लग्न लावले जात आहे, तो चांगले कमावतो. एखाद्याने फक्त प्रेमाने बोलला म्हणून ते प्रेम होत नाही. मुख्य म्हणजे त्या मुलाच्या घरचेही तुला पसंत करत नाहीत. अशा वेळी तू हट्टाने लग्न केलेस तर ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल.

आणि तरुणी तयार झाली…
पथकाने समजूत घातल्यावर तरुणी लग्नाला तयार झाली. तिने कुटुंबीयांनी निवडलेल्या मुलाशी आनंदाने लग्नाला होकार भरला. यानंतर कुठे घरच्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत