ऑगस्ट महिन्यात ५ दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांसाठी बंद

हैदराबाद- येत्या ऑगस्ट महिन्यात एका धार्मिक अनुष्ठानामुळे ५ दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवले जाऊ शकते. वैदिक परंपरेनुसार दर १२ वर्षांनी अधिक मासात अस्ताबंधना बाललया महासंपरोकषनाम हे अनुष्ठान होते.या वर्षी १२ ते १६ ऑगस्टदरम्यान हा विधी होत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दररोज तिरुपती देवस्थानात ३० ते ३२ हजार भक्तांना दर्शनाची परवानगी दिली जाते. या दृष्टीने ५ दिवस दर्शन सेवा बंद राहणार असल्याने दूरवरून येणाऱ्या भक्तांनी याचे नियोजन करावे, असा सल्लाही देवस्थानने दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे अनुष्ठान १९५८ पासून केले जाते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत