ऑल इंडिया सिफेरर्स अँन्ड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शिवमती वंदना मोरे यांची नियुक्ती

खालापूर : समाधान दिसले

ऑल इंडिया सिफेरर्स अँन्ड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी ताराराणी ब्रिगेड प्रदेश अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे एका सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांच्या हस्ते वंदना मोरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून गेली अनेक वर्षे या युनियनच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले गेले आहेत. तर अनेक तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.

सध्या कोरोना काळात समुद्री खलाशी बंधुना कोविड – 19 चे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे यासाठी युनियनने निवेदन दिले असून भारतीय समुद्री खलाश्यांची सुरक्षितता संबंधित शासकीय डिपार्टमेंटने घ्यावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारी ही एकमेव युनियन आहे.

तर सदर नियुक्ती पत्र स्विकारल्यानंतर युनियनच्या राज्य उपाध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात संबोधित करताना म्हणाल्या की, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून संकल्पित आलेली ही युनियन समुद्री खलाश्यांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. राष्ट्रीय संपत्तीतून मिळणारे खनिज तेल, मीठ, मासे व इतर उत्पादनांसाठी काम करीत असलेल्या प्रत्येक कामगारांच्या न्याय हक्कासाठी युनियनच्या सोबत मी प्रयत्नशील असेन. तसेच दहावी – बारावी नंतर मुलांना करियर प्रशिक्षण सेवा युनियनच्या माध्यमातून देऊन तरुणांना स्वावलंबी केले जाईल असे मत नवनिर्वाचित उपाध्यक्षा वंदना मोरे यांनी व्यक्त केले.

तसेच ऑल इंडिया सिफेरर्स अँन्ड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शिवमती वंदना मोरे यांची नियुक्ती इंडिया सिफेरर्स अँन्ड जनरल वर्कर्स युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शिवमती वंदना मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याने मोरे यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, महिला विभाग, पर्यावरण विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत