ऑस्ट्रेलियाहून परतताच या क्रिकेटपटूने दिली प्रेमाची कबूली

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for rishabh pant

हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज व यष्टीरक्षक रिषभ पंत हा प्रेमात पडला असून त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इशा नेगी असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. रिषभच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी त्या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. इशाने देखील तिच्या इंस्टाग्रामवर हाच फोटो शेअर करत ‘लव्ह ऑफ माय लाईफ’ असे कॅप्शन दिले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत रिषभ पंतने दमदार फलंदाजी करत सर्वांचे मन जिंकले होते. रिषभ आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णदार टीम पेनचा स्लेजिंगचा किस्सा देखील चांगलाच गाजला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी देखील पंतचे कौतुक केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत