ओदीशामध्ये दरड कोसळून १२ ठार, अनेकजण बेपत्ता

 

गुवाहटी : रायगड माझा वृत्त 

ओदीशात तितली चक्रीवादळाने थैमान घातले असून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गजपती जिल्हयात भूस्खलन झाले. यात १२ जण ठार झाले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

गजपती जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतला होता. यावेळी काहीजणांनी बरघारा गावाजवळील डोंगरातील एका पडक्या गुहेत धाव घेतली होती. अचानक पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा जोर वाढला आणि गुहेवरच दरड कोसळली. यामुळे अनेकजण आत अडकले होते. दगड कोसळल्याचे कळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी १२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पण अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत