ओरीसामधून गांजाविक्रीकरीता आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी केले जेरबंद; नेरळ पोलिसांची धडक कारवाई 

नेरळ  – कांता हाबळे
    नेरळ परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांनी गुप्त माहीतीच्या आधारे मिळाली होती. त्यावेळी एक इसम नेरळ स्टेशन परिसरात अमली पदार्थ विक्री करीता घेवून येणार असल्याचे खात्रीदायक वृत्त मिळताच नेरळ पोलिसांनी नेरळ रेल्वे  स्थानकात धाड टाकत ओरीसामधून गांजाविक्रीकरीता आलेल्या व्यक्तीकडून ५४ हजांराचा गांजा जप्त करून त्या इसमास जेरबंद केले आहे.
     याबाबत नेरळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नेरळ स्टेशन समोरील जयहिंद नाका येथे एक इसम अमली पदार्थ विक्री करीता घेवून येणार आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूळ व नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ जाधव व अन्य पोलिस कर्मचारी यांनी सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एक इसम पाठीवर काळया रंगाची सॅग घेवून रेल्वे स्टेशन वरून बाहेर येताना दिसला. त्यावेळी त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडून चौरस आकाराचा बॉक्स व त्यामध्ये २ किला ६५० गॅ्रम असा एकून अंदाजे ५४ हजार रूपयांचा गांजा जप्त करून सदर इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले.
     इसाराम सिमीया गमांग वय ३० वर्ष असे या इसमाचे नाव असून हा गुठठा, संभालपूर जि. गजपती, राज्य ओडीसा येथील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली असून याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस.कायदा कलम ८(क), २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यता आला असून अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी जांलिदर नालकूळ करीत आहेत.
    पोलिस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूळ व नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ जाधव, पोलिस उपनिरिक्षक आर. एन. तडवी, एस.एम.शिंदे, आर. एस. शेगडे, पोलिस नाईक शिवाजी पानपट्टे, अनिल खैरे, वैभव बारगजे यांनी ही धडक कारवाई केली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत