ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा

कर्जत : पळसदरी स्थानकातील घटना…

कर्जत : कांता हाबळे 

मध्य रेल्वेच्या पळसदरी रेल्वे स्थानकावर शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास स्थानकातील झाड ओहरहेड वायरवर पडल्याने मोठ्या प्रमाणात मेल -एक्स्प्रेस चा खोळंबा झाला. आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने पळसदरी स्थानकातील जुने झाड स्टेशन समोरील ओहरहेड वायवर कोसले आणि ओहरहेड वायर तुटली, त्यामुळे ओहरहेड वायरवर कोसळले झाड वायरच्याविद्युत क्षमतेमतेने जळून खाक झाले. तसेच काही वेळ मेल-एक्स्प्रेसचा खोळंबा झाला.  ओहरहेड वायर तुटल्याने काही मेल -एक्स्प्रेस कर्जत स्थानकात तर काही मेल गाड्या ह्या पळसदरी स्थानकाच्या अलीकडे थांबवण्यात आल्या होत्या.

रेल्वे प्रसासनाने तत्काळ रेल्वेची विद्युत सेवा बंद करून तो पडलेला झाड बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. प्रवाशांना होणारा त्रास आणि एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा लक्षात घेता रेल्वेने काम तत्काळ सुरु केले असून काही वेळातच रेल्वे सेवा सुरु होईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.