औरंगाबादमध्ये कॉपी नाही तर चक्क लव्ह लेटर सापडलं

औरंगाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

राज्यात सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु आहे. यातच औरंगाबादमध्ये एक भन्नाट प्रकार समोर आला आहे. भरारी पथकाला एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या खिशात चक्क लव्ह लेटर सापडलं आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील तेलवाडी इथे मंगळवारी (5 मार्च) हा प्रकार घडला. इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथक दाखल झालं होतं. इंग्रजी विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, त्यात एका मुलाच्या खिशात लव्ह लेटर सापडलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत