औरंगाबादमध्ये पुन्हा एका मराठा तरुणाने नदीत टाकली उडी

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

 मूक मोर्चानंतर आपल्या मागण्यांसाठी पेटून उठलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आता रौद्र रुप धारण केलं आहे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आता जागोजागी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकरित्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात पुन्हा एका युवकाने नदीत उडी मारली आहे. गंभीर म्हणजे ही नदी कोरडी असल्याने युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. देवगाव रंगारी येथील हा धक्कादायक प्रकार आहे.

स्थानिकांच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चाचं वादळ चिघळलेलं पहायला मिळतय. या युवकाचा मृत्यू म्हणजे मराठा मोर्चातील हा दुसरा अपघात आहे. सुदैवाने नदी कोरडी असल्याने यात युवकाचा जीव वाचला आहे.

काल काल दुपारी औरंगाबाद-अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं. त्याला काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत