औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, ७ जण जखमी

औरंगाबाद : रायगड माझा ऑनलाईन 

औरंगाबादमधील करमाड गावातील शेवगा शिवारात शुक्रवारी संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून या आगीत १६ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या आगीत सात जाण भाजले असून यात तीन महिला व चार बालकांचा समावेश आहे.

शेवगा गावातील जावेद बेग वाहेद बेग यांची गावात पानटपरी आहेत. त्यांचे भाऊ हे मिस्त्री आहेत. दोघेही सकाळी कामावर गेले होते. तर घरात महिला आणि मुलंच होते. संध्याकाळ झाली असल्याने घरातील सर्व महिला रात्रीच्या स्वयंपाक करण्यात व्यस्त होत्या. तर घरातील पाच मुले खेळत होती. या दरम्यान संध्याकाळी पाचच्या सुमारास घरात आग लागली. घरात कापूस असल्याने आग वेगाने पसरत गेली आणि काही कळायच्या आत घरातील सर्वजण आगीत होरपळू लागले. स्थानिकांना हा प्रकार लक्षात त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. या आगीत नूर मोहम्मद जावेद बेग या १६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. तर जकिरा जावेद बेग (वय ३०), महेक जावेद बेग (वय ८) यास्मिन राजू बेग (वय २८), अनिस बेग राजु बेग (वय १२) , अरमान बेग राजू बेग (वय १०), सुहाना इलियास बेग (वय ९), सुरय्या इलियास बेग (वय ३२) हे या आगीत जखमी झाले आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीचे नेमके कारण चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक आजिनाथ रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत