औरंगाबादेत गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न

फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे आज (शुक्रवार) गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला.

Human Sacrifice Rituals In Aurangabad Fulambri Ranjangoan

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे आज (शुक्रवार) गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पूजा सुरु होण्यापूर्वीच पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस)कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांना ताब्यात घेतले आहे.

नग्नावस्थेत सुरु होती पूजा…

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुप्तधन मिळवण्याच्या लालसेतून विधी होणार असल्याची गोपनिय माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळाली होती. या विधीसाठी एका लहान मुलीचा बळीही देण्यात येणार होता. काहीजण नग्नावस्थेत पूजेच्या विधीच्या तयारी असतानाच पोलिस आणि अंनिस कार्यकर्ते याठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

संबंधितांनी पूजा करण्‍यासाठी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत