औरंगाबाद हिंसाचार : जाळपोळ पोलिसांच्या मदतीनेच?

औरंगाबाद :रायगड माझा

दोन गटांकडून जाळपोळ सुरू असताना त्यामध्ये पोलिसांचाही सहभाग होता, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्यानंतर त्यांनी जाळपोळ सुरू केली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत १० पोलीस चालत होते, असं नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. जमाव वाहनं पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे. हिंसाचारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही.

‘हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सर्व पोलिसांवर आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत