कपाडिया मार्केटला मिळणार नवा लूक !

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचा पुढाकार 

माथेरान : मुकुंद रांजाणे 

माथेरा शहराच्या मध्यवर्ती भागात २७ एप्रिल  १९१९ रोजी रतनबाई  स्थापिलेल्या कापडीया मार्केटच्या शतकामहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना एका नव्या उगमाकडे नेण्यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या कटिबद्ध दिसत आहेत .  ३१ मे रोजी संपूर्ण कपाडिया मार्केटची स्वतः पाहणी करून येथील बंद तसेच मोडळकळीस  आलेल्या गाळ्यांच्या विद्रुपीकरणामुळे हा एकंदरीतच भाग अत्यंत खराब अवस्थेत आहे.
२७ एप्रिल २०१९ मध्ये या मार्केटला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे येथे असलेले जुने बंद अन मोडकळीस आलेल्या गाळ्यांची डागडुजी दुरुस्ती करणे,त्याचप्रमाणे अंतर्गत भागात रिकाम्या असलेल्या जागेवर सुयोग्य पद्धतीने रचना करून ह्या ठिकाणी फक्त गरजवंताला व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.
शतकामहोत्सवी वर्षात मुख्य प्रेवशद्वारावर यापूर्वी दोन संगमरवरी सिंह मागील अनेक वर्षांपासून काढून टाकण्यात आले होते.ते पर्यटकांचे खासकरून आकर्षण बनले होते. ते पुन्हा नव्याने या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणार आहेत. पूर्वेकडील बाजूस असलेल्या मटण, मच्छीमार्केटच्या डागडुजीसह जुन्या पीठ गिरण्यांच्या गाळ्यांची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे.
ही सर्व कामे नगरपालिकेने नियुक्ती केलेल्या पीएमसी सुनील कुकडे यांना दाखविण्यात आली आहेत.  त्याप्रमाणे लवकरच मार्केटच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करून ठेकेदारामार्फत ही कामे जलदगतीने २७ एप्रिल२०१९  ह्या कपाडिया मार्केटच्या शतकमहोत्सवी वर्षात पुर्ण करण्यात येणार आहेत.
या मार्केटने आजवर अनेकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवित आहेत.तर परिसरातील लोक सुद्धा याच ठिकाणी अनेक वर्षांपासून आपले व्यवसाय करत आहेत.
या ठिकाणी बसण्यासाठी बाके तसेच वृक्षारोपण करून हा संपूर्ण भाग हरित करण्याचा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचा मानस आहे.तर विविध ठिकाणी विजेची सोय, पेव्हर ब्लॉकचे पटांगण आणि संरक्षण रेलिंग टाकण्यात येणार आहे जेणेकरून मालवाहतूक घोड्यांना मार्केट मध्ये प्रवेश न देता प्रेवशद्वाराजवळ घोडे उभे करून सर्व सामान मानवीय पद्धतीने आत आणण्यासाठी सोय होऊ शकते.
त्यावेळेस बाई रतनबाई ह्या माथेरान मध्ये दि.२९ एप्रिल १९१७ रोजी माथेरान मध्ये मयत झाल्या होत्या त्यांच्या स्मरणार्थ पेस्तनजी नौरोजी कापडिया यांनी १९१९ मध्ये माथेरानच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कपाडिया मार्केट बांधून नगरपालिकेकडे हस्तांतरण केले होते. एका विशिष्ट आकारणी पद्धतीने ह्या एकूण दोन एकरांच्या जागेवर लहानमोठे व्यावसायिक गाळे तसेच पूर्वेकडील बाजूला पिठाच्या गिरणी उभारलेल्या आहेत. ह्या गिरणी अनेक वर्षांपासून बंद अन त्यावरील छप्पर गायब झालेले आहे. भिंती कोसळल्या आहेत. एकंदरीतच या ठिकाणी बकालपणा अन भग्नावशेष गिरण्या ह्या नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षीत पणामुळे आलेला आहे. अनेक गाळे हे बंद आहेत ते सुरू केल्यास त्याचप्रमाणे गाळ्यांची डागडुजी, दुरूस्ती करणे गरजेचे आहे. तर काही गाळे धारकांनी आपल्या नावे असलेले गाळे वार्षिक भाडेतत्त्वावर दिलेेेले आहेत.ज्यांना हे गाळे सुरू करावयाचे नाहीत त्यांनी नगरपालिकेकडे वर्ग
करून गरजवंतांसाठी ,महिला बचत गट तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना दिल्यास बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार नाही.मुख्य रस्त्यावर उन्हातान्हात, पावसाळ्यात व्यवसाय करणाऱ्या गरजुंना  येथील मोकळ्या जागेत व्यवसाय करता येऊ शकतो. त्यांचाही प्रश्न या निमित्ताने मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होऊ शकतो.ह्याच दूरदृष्टीने नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या पाहणी वेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या सोबत नगरसेवक शकील पटेल, नगरसेविका सोनम दाभेकर, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद  रांजाणे,दत्ता शिंदे यांसह नगरपालिकेने नियुक्ती केलेले पी.एम.सी. सुनील कुकडेआणि त्यांचे शिष्टमंडळ तसेच स्थानिक  मान्यवर उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत