करचोरी प्रकरणी ‘आप’ मंत्र्यांच्या घरावर छापा

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for kailash gahlot

दिल्लीचे दळणवळण मंत्री कैलाश गहलोत यांच्या घरी आज आयकर विभागाचे छापे पडले आहेत. गहलोत यांच्यावर करचोरी केल्याचा आरोप असून भाजप राजकीय सुडाच्या भावनेतून ही कारवाई करत असल्याची आम आदमी पक्षाची भूमिका आहे.

आज सकाळी अचानक कैलाश गहलोत यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली. गहलोत यांच्या घरासोबत त्यांच्याशी निगडीत १६ जागांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या . एकूण ३० अधिकाऱ्यांनीही कारवाई केली आहे. गहलोत यांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवला असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे.

गहलोत यांच्यांवर होत असलेल्या या कारवाईचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निषेध केला आहे. ‘नीरव मोदी, विजय माल्या यांच्या घरांवर छापे पडत नाहीत, पण लोकांसाठी चांगलं काम करणाऱ्या आपच्या मंत्र्याच्या घरावर असे छापे पडतात. याआधी माझ्यासह मनीष सिसोदीयांच्या आणि सत्येंद्रच्या घरांवरही छापे पडले होते. पण यातून काहीच हाती लागलं नाही. आता पुढचा छापा टाकण्याआधी दिल्लीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सरकारची माफी मागायला हवी.’ अशा शब्दात केजरीवाल केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. आप पक्षाकडूनही या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत