करमरकर शिल्पालय – सासवणे (अलिबाग)

सासवणे (अलिबाग) येथील करमरकर शिल्पालयाबद्दल बरंच ऐकुन होतो, पण भेट देण्याचा योग काहि आला नव्हता. ३ मार्च रोजी मायबोलीकर परदेसाई यांच्या गटगनंतर योरॉक्स, सुन्या आणि अस्मादिक यांचा प्लान ठरला ४ तारखेला अलिबागला जायचे. कोरलई किल्ला करायचा किंवा गेटवे ऑफ इंडियाला भेटुन बोटीतुन एक फेरी मारायची असा प्लान होता. कोरलईला बराच वेळ गेला असता म्हणुन गेटवेहुन बोटीने मांडवा आणि मांडव्यावरून सासवणे येथील प्रसिद्ध करमरकर शिल्पालय आणि नंतर सासवणे समुद्रकिनारा आणि साधारण तीन-चार वाजेपर्यंत मुंबईला परत असा साधारण बेत होता.

करमरकर शिल्पालयाबद्दल थोडंसः
अलिबागच्या निसर्गरम्य अष्टागारातील आवास जवळील सासवणे या गावी जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर तथा नानासाहेब करमरकरांचे हे संग्रहालय आहे. अलिबाग-मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासुन साधारण तीन किमी अंतरावर करमरकर शिल्पालय आहे.
चित्रकार द.ग.गोडसे म्हणायचे, “आम्ही चित्रकार चित्रं काढतो, तेंव्हा रसिक म्हणतात हि चित्रं जिवंत आहेत, बोलतात. पण रंग-रेषाच्या करामतीनें कला कुसरीने ते शक्यहोऊ शकतं पण करमरकर जेंव्हा दगडाला जिवंतपणा आणतात हे काम मुश्किल आणि भारीच अवघड कारण इथे सुधारण्याला अवकाश नसतो. एकदा छिन्नी मारली की तो क्षण गेला…” हे क्षण अनुभवायचे असेल तर तर करमरकर शिल्पालयात जावेच लागेल.

 

जायचे कसे: 
१. मुंबईहुन अलिबाग. अलिबागहुन मांडवा-रेवसला जाणार्‍या रस्त्याने आवास फाट्यावर उतरून (चोंडीगावाच्या थोडे पुढे) रिक्षाने सासवणे गावात.

२. मुंबई (गेटवे ऑफ इंडिया) येथुन सुटणार्‍या बोटीने (तिकिट दर ११० रूपये अप्पर डेक आणि ९० रूपये लोअर डेक) मांडवा येथे आणि त्याच तिकिटाने बसने आवास फाट्यापर्यंत. तेथुन रिक्षाने सासवने (अंदाजे ७-८ रूपये माणशी).
संग्रहालयाचे तिकिटः माणशी फक्त १० रूपये आणि फोटो किवां व्हिडीओ काढायचे असल्यास त्यासाठी १० रूपये.

 

 

फोटोस: 

     

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत