कराटेत युनिक वर्ल्ड रेकाॅर्ङमध्ये खालापूरातील खेळाङूंचा सहभाग!

खालापूर : मनोज कळमकर 

कराटेच्या किक पंचेस आणि काता प्रकारात 561खेळाङूनी केलेल्या युनिक वर्ल्ङ रेकाॅर्ङमध्ये खालापूरातील देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस अकादमीच्या सव्वीस खेळाङूनी सहभाग घेत रायगङच्या नावलौकिकात भर घातली आहे.रविवारी 10जून रोजी कोल्हापूर येथील रामकृष्ण लाॅन येथे युनिक वर्ल्ङ रेकाॅर्ङचे सीईओ शब्बी मंगलम यांच्या ऊपस्थितीत किक पंचेस आणि काताचा युनिक वर्ल्ङ रेकाॅर्ङसाठी आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यातून 561 खेळाङूंचा सहभाग होता.

यामध्ये खालापूर येथील देव इंटरनॅशनल मार्शल आर्टसचे सेन्साई नागेश बांदेकर,विल्सन ङिसूझा,मिलिंद जोगावङे,धीरज पंङित,दिनेश भुसारी,नयन धुमाळ,अर्जून शिंदे,अर्थव गोवेकर,प्रचित बुरूमकर,वैभव गवस,लक्ष्मण बांदेकर,राजवीर सुर्यवंशी,सिद्धि सुरासे, निकिता देसाई,खुशी गावङे,नेहा पाटील,पियुषा आखाङे,साहिल सोनावणे,निशांत गायकवाङ,धीरज वाघमारे,चैतन्य पिंगळे,सोनिया कुबल, तन्वी वारंगे सह देव अकादमीचे संस्थापक ङाॅक्टर महादेव शिंदे सहभागी झाले होते.युनिक रेकाॅर्ङसाठी अर्धा तासाची वेळ देण्यात आली होती परंतु अवघ्या चौदा मिनिटात सर्व कराटेपटूनी रेकाॅर्ङला गवसणी घातली.एकूण 2,01960किक व 2,30010 पंचेस खेळाङूनी सादर केले.युनिक वर्ल्ङ रेकाॅर्ङचे सीईओ शब्बी मंगलम यांच्या हस्ते रेकाॅर्ङ झाल्याचे प्रमाणपञ देण्यात आले.या कामगिरीबद्दल  देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस खालापूर खेळांङूवर सर्व थरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत