कराड येथून तीन शालेय मुली बेपत्ता

रायगड माझा वृत्त 

कराड: येथील एका शाळेतील दहावीत शिकणार्‍या तीन मुली गुरुवारी सकाळी त्या कोणासही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. शोधूनही त्या न सापडल्याने बेपत्ता झाल्याची नातेवाईकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील एका शाळेतील तीन इयत्ता 10 वीमधील शिक्षण घेणार्‍या तीन विद्यार्थिनी शाळेत जातो असे सांगून गुरुवारी सकाळी घरातून गेल्या आहेत.
त्या अद्याप घरी परत आल्या नाहीत. त्यांचा शोध शाळेमध्ये, मैत्रिणीकडे घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या बेपत्ता झाल्याची आणि कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी काल रात्रीपासून तपासाची सूत्रे हलवली आहेत. मात्र फारशी माहिती हाती लागली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत