करिनाला फॅन्सकडून तैमूरचं पेंटिंगची भेट…

करीनाच्या फॅन्सने तिला चक्क तैमूरचं पेंटिंग भेट म्हणून दिल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करिना कपूर ऑस्ट्रेलियातील सिडनीत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिच्या फॅन्सच्या एका गटाने तिला तैमूरचं एक पेंटिंग भेट म्हणून दिलं आहे.

अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लाडक्या तैमूर अली खानची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. या आधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये करिना कपूरने टी-२० वर्ल्ड कप चषकाचं अनावरण केलं होतं. या कार्यक्रमासाठी आलेली करिना खूपच सुंदर दिसत होती. ऑस्ट्रेलियातील या कार्यक्रमात सहभागी होण्याआधी करिना कपूर तैमूरला सैफ अली खानजवळ दिल्लीत ठेवून आली होती. सैफ अली खान सध्या त्याच्या एका सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी दिल्लीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत