कर्जतच्या राहतेकरांच्या विनोदी कुटप्रश्नाच्या प्रहेलिकेचा दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश

कर्जत : संजय गायकवाड

रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात राहणारे संस्कृत भाषेचे कवी व लेखक सदाशिव त्र्यंबक राहतेकर यांच्या काव्यप्रवाह या काव्यसंग्रहातील काव्यमय विनोदी कूट प्रश्नाच्या प्रहेलिकेचा यंदाच्या संयुक्त व संपूर्ण संस्कृत च्या 10 वी च्या पाठयपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

पाठयपुस्तकात साहित्याचा समावेश असणारे रहातेकर हे कर्जतचे पहिलेच साहित्यिक आहेत. त्यांच्या तीन पुस्तकांपैकी हास्यप्रवाह व काव्यप्रवाह ही पुस्तके अभ्यासकांच्या व पर्यायाने विश्वविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे रामटेक नागपूर येथील संस्कृत विश्वविद्यालयाने त्यांना कळविले आहे. राहतेकर हे कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेचे 1951-52 चे दहावीचे माजी विद्यार्थी आहेत. रेल्वेतून जबाबदारीच्या पदावरून 1991 साली निवृत्त झालेल्या राहातेकर यांनी राज्य शासनाने राष्ट्रीय पंडित म्हणून गौरविले होते. मराठी संस्कृत शब्दकोशकार कै. मो.के. काळे यांचेकडे त्यांच्या या आवडत्या भाषेचे अत्यंत चिकाटीने अध्ययन करून वयाच्या 84 व्या वर्षी संस्कृत विश्वविद्यालयाच्या व अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पुस्तकांची निर्मिती करून संस्कृत साहित्यात भर घातली आहे. छंद हे वार्धक्यातील चांदणे ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. 2011 साली पत्नीच्या झालेल्या निधनाने एकाकी जीवनात खचून न जाता त्यांनी 2014, 2016 आणि 2017 साली अशा तीन संस्कृत पुस्तकांची निर्मिती केली आहे त्यांचे हे कार्य ज्येष्ठांसाठी आदर्श आहे. फोटो सदाशिव रहातेकर (संजय गायकवाड)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.