कर्जतच्या विशेष शिबीरात ५३ कूपोषीत मूले ३७ गरोदर माताची तपासणी

खाजगी तद्य डाँक्टरा सह, डि वाय पाटील मेडीकल काँलेजच्या टिम ने केली रूग्णाची तपासणी  व उपचार 

नेरळ – कांता हाबळे
कुपोषण मूक्त मोहीमेच्या दूस-या टप्प्याला रविवारी कर्जतच्या उपजिल्हा रूग्णालयातुन सूरूवात झाली आहे.  या मोहीमेअंतर्गत विशेष आरोग्य तपासनी व उपचार खाजगी तद्य डाँक्टरसह, डिवाय पाटील मेडीकल काँलेजच्या टिम ने केली रूग्णाची तपासनी केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    जिल्हाधीकारी मा. डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पने नूसार राबवण्यात येणा-या या मोहीमेत प्रत्येक रवीवारी वेगवेगळ्या आजारावर उपचार करणारे तज्ञ डाँक्टराच्या टिमच्या माध्यमातून ही विशेष शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहीती या वेळी उपविभागीय आधीकारी वैशाली परदेशी यांनी आयोजित कार्यक्रमात दिली.
     यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अजीत गवळी, जिल्हा आरोग्य आधीकारी डॉ. सचीन देसाई, नायब तहसीलदार संजय भालेराव, बालरोग तज्ञ डॉ. प्रेमचंद जैन, रायगड मेडिकल असोशियनचे डॉ.डोंगरे सूनिल, तालूका आरोग्य आधीकारी डॉ. सि.के.मोरे, एकात्मीक बालविकासचे प्रकल्प आधीकारी दत्ता वाघमारे, निशीगंधा भवाळ, दिशा केंद्राचे अशोक जंगले आदि उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या हस्ते वृक्षारोपनही करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत