कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयात ‘कोविड शिल्ड’ लसीकरणास सुरुवात

कर्जत : अजय गायकवाड

रायगड जिल्ह्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते कोविड शिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी यांना देण्यात येत असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना सर्वप्रथम लस देऊन सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कर्जत तालुक्यातील आरोग्य विभाग अधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सुरू झालेली लसीकरण मोहीम खूप प्रभावशाली आहे. मागील वर्षापासून हाहाकार माजवलेल्या कोरोनावर यशस्वीरीत्या मात करण्यासाठी कर्जत तालुक्यात सुद्धा ही मोहीम सुरू झाली आहे. कर्जतमध्ये आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या उद्घाटन प्रसंगी कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पुरी, डेप्युटी बिडीओ राजपूत, वैद्यकीय अधीक्षक बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी सी के मोरे, नगरसेवक संकेत भासे, शरद हजारे,.डॉ.फड आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत