कर्जतमध्ये आयुर्वेदिक दवाखाना सुरू : नागरिकांमध्ये समाधान

मुकुंद रांजाणे

कर्जत : कर्जत ही रायगड जिल्ह्याचे एक महत्वपूर्ण ठिकाण असून नावाजलेले स्थळ आहे. या तालुक्यात अनेक गावे येत असून आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी वाड्यातील लोक याच बाजारपेठेत खरदेसाठी नियमितपणे येत असतात. ग्रामीण भाग असल्याने अनेकदा सर्वसामान्य लोकांनाही आजारांना सामोरे जावे लागते आहे. दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली औषधांची यादी मेडिकल मधून घेतांना खर्चिक बाब होत असते.यासाठी स्वस्त दरात आणि फायदेशीर ठरणारी आयुर्वेदिक औषधे सर्वसामान्य गरजवंत लोकांना माफक दरात उपलब्ध व्हावीत यासाठी येथील नामदेव दगडे यांनी नुकताच आयुर्वेदिक औषधांचे दुकान उपलब्ध केले असून याचे उद्घाटन रायगड जिल्हा उप जिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कर्जत मधील हे पहिलेच आयुर्वेदिक औषधे दुकान असून आता यापुढे सर्वांनाच याचा मोठया प्रमाणात लाभ घेता येणार आहे.
या दुकानात सर्वच आजारांवर स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत. यामध्ये लकवा, संधिवात, हृदयरोग, मणक्याचे आजार, मूत्रपिंड विकार, श्वेतपदर (रक्तस्राव) ,दमा, सर्दी एलर्जी, मधुमेह, कर्करोग (कॅन्सर ),त्वचाविकार, मूळव्याध, पायरिया, डेंग्यू, थायरॉईड, स्वप्नदोष, मोटापा, वंध्यत्व, केस गळणे,मोतीबिंदू, कान,नाक, घसा,शारीरिक कमजोरी (दुबळेपणा) अशा आजारांवर ही औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.या उद्घाटन वेळी कर्जत येथील सुरेश शिर्के, भारत बडेकर,शरद मावकर, सूर्याजी ठाणगे, संतोष बोराडे, किरण चावरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

मध्यंतरी मी पंढरपूर येथे गेलो असता तेथील आयुर्वेदिक औषध घेतल्यावर माझाआजार पुर्णतः बरा झाला आहे. त्यामुळे मी सदरची औषधे जर कर्जत तालुक्यातील गरजवंत लोकांसाठी माफक दरात उपलब्ध करून दिली तर ते सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे.यासाठी मी तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यावरच हे कर्जत मधील एकमेव आयुर्वेदिक औषधे दुकान सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून सर्वांना याचा कमी खर्चात लाभ घेता येईल. याच माध्यमातून नागरिकांची आर्थिकदृष्ट्या बचत होऊ शकते.

नामदेव दगडे — औषधे दुकानदार, कर्जत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत