कर्जतमध्ये विवाहबाह्य प्रेम संबधातून प्रेमी युगालांची आत्महत्या

कर्जत : भूषण प्रधान

विवाहबाह्य प्रेम संबधातून प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. या घटनेने कर्जत तालुका हादरला असून या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टी लिहून ठेवली असल्याचे देखील समोर आले आहे.

कर्जत तालुक्यातील सचिन अर्जुन घुडे या बत्तीस वर्षीय तरुणाचे नम्रता सूर्यकांत मराडे या विवाहित महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. यांचे हे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर ही महिला सचिन घुडे यांच्या सोबत पळून देखील गेली होती. मात्र कुटुंबातील लोकांनी समजावल्यानंतर ती परत आली होती. यानंतर तिचा पती तिच्यासह पनवेल येथे राहण्यास गेला. मात्र तरीही या दोघांचा संपर्क सुरु होता. आपले विवाहबाह्य प्रेमप्रकरण सर्वांना माहित झाल्याने आपली बदनामी झाल्याची भीती मनात बाळगून या दोघांनी कर्जत तालुक्यातील वडवली नदीच्या पुलाखाली आत्महत्या करून आपले जीवन संपविले. मृत महिलेला एक पाच वर्षांचा मुलगा असून मृत तरुण हा अविवाहित आहे. वडवली येथील रोहिदास मराडे यांच्या निदर्शनास हि घटना आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

विवाह्यबाह्य संबंध आणि अनैतिक गोष्टींमुळे अशा प्रकारच्या घटना घडत असून अशा प्रकरणातून बोध घेण्याची आवश्यकता असल्याचे पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी म्हंटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत