कर्जतमध्ये सकल मराठा समाजाचा वतीने चक्काजाम आंदोलन!

कर्जत : भूषण प्रधान । अजय गायकवाड 

आरक्षणाच्या लढाईत वीरमरण स्विकारलेल्या काकासाहेब शिंदे या आमच्या समाज बांधवांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही यासाठी कर्जामध्ये आंदोलन पुकारण्यात आले. सकल मराठा समाजाच्यावतीने सरकारचा जाहिर निषेध करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली होती. त्यानुसार कर्जत सकल मराठा समाजाच्यावतीने कर्जत बंद करण्यात आले.

कल्याण कर्जत आणि कर्जत मुरबाड राज्यमार्ग आंदोलकांनी आडवून ठेवला

चारफाटा येथे बंदची हाक देऊन कर्जत चारफाट्यामध्ये हजारो सकल मराठा समाजाच्यावतीने कर्जत कल्याण आणि कर्जत मुरबाड हे मार्ग रोखून ठेवले होते. आपल्या न्याय हक्कासाठी आणि सर्व मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कर्जत शहरातील रिक्षा संघटनेने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी आपली सेवा बंद ठेवली होती.

कर्जतमधील सकल मराठ्यांनी कर्जतमध्ये बंदची हाक दिल्यानंतर हजारो मराठा बांधवांनी शिवाजी चौकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रँलीच्या माध्यमातून घोषणाबाजी देत कर्जत चारफाटा येथे चक्काजाम केले. दार दुसरीकडे मराठा समाजाच्या तरुणांनी कर्जत रेल्वे स्टेशन गाठून त्यांनी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला.

मुबई पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे आंदोलकांनी रोखून ठेवल्या

कर्जत चारफाटा येथे सकल मराठा समाज बांधवांनी सुरु केलेल्या बंदमध्ये तरुणांसह शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या समाज बांधवांबरोबर सहभाग घेतला. मराठा समाजाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान आंदोलनाच्या वेळी रुग्णना घेऊन आलेल्या अँब्युलन्सला तरुणांनी मार्ग देत मराठा समाजाचा आदर्श कायम ठेवला. जवळजवळ दिड तास शांततेच्या मार्गाने चाललेल्या बंदमध्ये कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंधर नालकुल, कर्जतचे तहसिलदार अविनाश कोष्टी, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी उपस्थिती लावून सर्व मराठा बांधवांना बंद थांबविण्यासाठी आव्हान करण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत