कर्जतमध्‍ये भात पेरणीची लगबग!

पेरणीच्‍या कामाल वेग, पावसाच्‍या आगमनाने बळीराजा सुखावला

नेरळ : कांता हाबळे  

रायगड जिल्‍हयासह कर्जत तालुक्‍यात पावसाने दमदार सुरूवात केल्‍याने शेतक-यांनी आपल्‍या शेतात पेरणीला सुरूवात केली आहे. शेतकरी आपल्‍या श्‍ेातात नागंरणी करून भात पेरणी करत आहेत. सर्वञ पेरणीच्‍या कामाला वेग आला असून ब‍ळीराजा सुखावल्‍याचे चिञ सर्वंञ आहे.
जून महिन्‍याच्‍या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्‍याने शेतक-यांनी शेतीच्‍या कामाला सुरूवात केली आहे. बैलाने नागंरणी करणे कमी झाल्‍याने किंवा नांगरजोडी मिळत नसल्याने सर्वञ टॅक्‍टरने नांगरणी करून भात पेरणी केली जात आहे. शेतकरी आपल्‍या शेतात रत्ना, वायएसआर, कोमल, सुप्रीम सोना, शुभांगी, कावेरी 21, सिरम, चिंटू, कर्जत 7, सह्यादी 4, अशा विविध प्रकारची भात बियाने आपल्‍या शेतात पेरणी करत आहेत. भात पेरणी करण्‍यालायन पाउस पडत असल्‍याने शेतकरी आनंदात असल्‍याचे पहायला मिळत आहे.
पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी राब करणे, शेताची बंधिस्ती, अशी अनेक कामे करत असतो, मजूर मिळत नसल्याने आणि मजुरीही महाग झाल्याने शेतकऱ्यांना स्वतः मेहनत घेऊन आपल्या शेतात काम करावे लागते, एकूणच शेतकरी चार महिने शेतीच्‍या कामात मग्‍न असल्‍याचे पाहायला मिळत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत