कर्जत आगारातील अधिकाऱ्यांची बेफिकीरी प्रवाश्यांच्या जीवावर 

बसचालकाच्या सतर्कतेमुळे टळला अपघात

 नेरळ । दर्वेश पालकर
कळंब-नेरळ मार्गावरील एक संभाव्य अपघात एस टी बसचा चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे टळला.कर्जत एस टी आगाराच्या ओलमन-नेरळ बसचे मागील चाकाचे नट्स  निघाल्याने मोठा अपघात होता होता वाचला. चालकाला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने बिरदोले नजीक गाडी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला.

कर्जत आगाराची बस क्रमांक  MH20 D8677 ही बस बुधवारी दुपारी 1वा.सुमारास ओलमनहुन नेरळकडे येत असताना वाहनचालक  चव्हाण यांना गाडीच्या चाकांमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आला व त्यांनी बस थांबवून चाकांचे निरीक्षण केले असता मागील चाक तीन पैकी दोन नट ढिले होऊन निघाले असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. खरे तर बसच्या चाकाला 8 नट बसवलेले असतात पण या बसच्या चाकास बसवलेल्या 8 नटसपैकी  5 नट आधीच निघालेले होते तर उरलेल्या 3नट्स पैकी 2 सैल होऊन निघाले होते त्यामुळे ते चाक बसपासून निखळून अपघात होण्याची  स्थिती निर्माण झाली होती .चालक चव्हाण यांनी स्वतः च ते नट बसवून गाडी नेरळपर्यंत नेली .बसचा चालक  चव्हाण व वाहक आगीवले यांनी दाखवलेल्या सावधगिरीमुळे ओलमन बसमधील 25 प्रवाशयांचा जीव वाचला.
मात्र असे असले तरी कर्जत आगारातील एस टी चे अधिकारी आपले कर्मचारी व प्रवाशी यांच्या बाबतीत किती बेफिकीर आहेत याची प्रचिती बसमधील सर्वांना आली. कर्जत आगारात  बस कर्तव्यावरील वाहक व चालक यांच्या ताब्यात देण्यापूर्वी तिची तपासणी करून मगच रवाना केली जाते .स्थानिक फेऱ्यांबाबत इतकी बेफिकिरी का असा प्रश्न विचारला जात आहे.
या संदर्भात अधिक चौकशीकरिता कर्जत आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत