कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील दोन गाड्या एकमेंकावर आदळल्या!

कर्जत : कांता हाबळे 

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर रविवारी दुपारच्या सुमारास बेकरे गावाजवळ वेगनार आणि स्वीप्ट डिझायर या दोन गाड्यांमध्ये मोठा अपघात झाला. गाड्या एकमेकांना धडकल्याने दोन्ही गाड्या पलटी झाल्या असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वांगणी येथील प्रशांत चौधरी हे आपल्या वडीलांसह कर्जतला आपल्या वेगनार गाडीतून जात होते. बेकरे गावाजवळ आले असताना पाठीमागून भिवंडी येथील निखिल साळुंखे यांची स्वीप्ट डिझायर ही गाडी खड्यांमध्ये आपटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. गाडीवर नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन प्रशांत चौधरी यांच्या वेगनार गाडीला धडकली आणि या दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला पलटी झाल्या.
या भयानक अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे ”देव तारी त्याला कोण मारी” असेच म्हणण्याची वेळ या अपघाता वरून दिसून येत आहे. कोणतीही जीवतहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

One thought on “कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील दोन गाड्या एकमेंकावर आदळल्या!

  1. रसत्यांची काम काय जीवित हानि झाल्यानंतर सुरु होणार आहेत का?
    इतक ढिम्म प्रशासन मोदी सरकारच्या करकीरदितच पाहायला मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत