नेरळ : कांता हाबळे
कर्जत तालुक्यातील मानिवाली येथे गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनानिमित्त मानिवली येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सकाळी 10 वाजता मानिवली येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिनंदन करण्याचे आयोजन करण्याचे आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती मानिवली व केंद्र दहीवली मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली गावातील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात क्रांतीदिन सोहळ्याचे आयोजन करणात आले होते. प्रथमतः आ. सुरेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मानिवली गावचे सुपुत्र वीर हिराजी गोमाजी पाटील, वीरभाई कोतवाल, शहीद भगत मास्तर या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्मारकातील प्रतिमांना पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश लाड, कर्जत पंचायत समितीचे सभापती प्रदीप ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, मानिवली ग्रामपंचायत च्या सरपंच, पुष्पा मुकणे, उप सरपंच प्रीतम डायरे, सदस्य प्रवीण पाटील, आदी सदस्य, तसेच अरविंद पाटील, गटविकास अधिकारी बालाजी कुरी, हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामसेवक, पोलीस अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
शेयर करा