कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान

नेरळ : रायगड माझा वृत्त

कर्जत तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला.रायगड प्रेस क्लबचा हा उपक्रम असून कर्जत तालुक्यातील पत्रकार यानिमित्ताने शेताच्या बांधावर हजर होते.

कर्जत तालुक्यातील चिंचवली गावातील शेतकरी विनोद भगत यांच्या त्यांच्या भाताच्या शेतावर सत्कार करण्यात आला.कृषी विभागाच्या शेतीतील विविध पुरस्कार मिळविणारे विनोद भगत यांच्या वय 40 असून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून केलेली शेती आणि तिला दिलेली प्रयोगशीलतेची जोड दिली आहे. शेताच्या बांधावर सन्मान विनोद भगत यांनी सपत्नीक स्वीकारला.त्यावेळी स्थानिक शेतकरी अशोक तळपे,भालचंद्र कांबरी,तानाजी भगत,राजेंद्र लदगे,अनंता लदगे,दशरथ भगत,काशीनाथ मुने,अनंता माळी,जयवंत भगत,दर्शना भगत,चरणदास भगत,विशाल भगत,निशा भगत,प्रसाद भगत आदींसह ग्रामपंचायत सदस्य सारंग कराळे यांची उपस्थिती होती.राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य संतोष पवार,तसेच मराठी पत्रकार परिषदेचे कोकण सचिव संतोष पेरणे,रायगड प्रेस क्लबचे संघटक संजय मोहिते यांचे हस्ते झाला.

 

नसरापूर येथे पॉलिहाऊस मधील प्रयोगशील शेती करणारे तरुण शेतकरी नरहरी थोरवे यांचा सन्मान जरबेरा फुलांची शेती असलेल्या शेतात करण्यात आला.नरहरि थोरवे यांची शेती बघून परिसरातील अनेक शेतकरयांनी प्रयोगशील शेती सुरू केली आहे. नसरापूर,सालवड,गणेगाव,या भागातील शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्यात गजानन मोहिते,हरिश्चंद्र मोहिते,अनंता दळवी,गोपीनाथ मोहिते,अर्जुन मोहिते,काशीनाथ दोरे,संभाजी मोहिते,सुरेश देवघरे तसेच स्थानिक पोलीस पाटील आदी उपस्थित होते.रायगड प्रेस क्लब,कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.त्यात जिल्हा चिटणीस दर्वेश पालकर,तसेच अजय कदम,गणेश मते,गुरुनाथ नेमाणे,कांता हाबळे,दिनेश सुतार,गणेश पवार,अजय गायकवाड,श्वेता शिंदे,विपुल माळी,आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.